Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील ऑटोचालकांच्या मी सदैव पाठिशी.. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.....

चंद्रपूर जिल्ह्यातील ऑटोचालकांच्या मी सदैव पाठिशी.. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.. मुख्य बस स्थानक समोरील ऑटो स्टॅण्ड टिनाच्या शेडचे भूमिपूजन

चंद्रपूर : आमदार असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ऑटोरिक्षा चालकांसाठी विधीमंडळ सभागृहात संघर्ष केला आणि मंत्री झाल्यावरही त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिलो. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांना मी माझ्या परिवाराचा घटक मानतो. जिल्ह्यातील ऑटोचालकांच्या पाठीशी मी सदैव ठामपणे उभा आहे आणि भविष्यातही राहील, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरुवार) दिली.

महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या मुख्य बस स्थानक समोरील ऑटो स्टॅण्ड टिनाच्या शेडचे भूमिपूजन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. ना. श्री. मुनगंटीवार यांनी या कामासाठी ६९ लक्ष ३९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेने त्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाला भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, जिल्हा सचिव सुनील धंदरे, संघटन प्रमुख विनोद चन्ने, भाजपाचे नेते रामपाल सिंग,अरुण तिखे, सुरेश तालेवार, दशरथ सिंग ठाकूर, बी बी सिंग, सचिन कोत्तपल्लीवार, चांद सैय्यद, सत्यम गाणार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांना ऑटो चालवत असताना येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मागणीनुसार, ऑटोरिक्षा स्टॅण्डचे नुतनीकर आणि सौंदर्यीकरण आदी कामांसाठी ६९ लक्ष ३९ हजार रुपयांना मी मंजुरी दिली. कारण या सर्वांना मी माझ्या परिवाराचा घटक मानतो. ऑटो चालकावर लावलेला वाहन कर रद्द करण्यासाठी विधानसभेत संघर्ष केला. व्यावसायिक कर रद्द करण्यासाठी देखील आवाज उठवला. मंत्री झाल्यानंतर हे दोन्ही निर्णय होऊ शकले याचा मला आनंद आहे.’ ऑटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन होण्याच्या संदर्भात या महिन्यात बैठक लागणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

*ऑटो चालकांना म्हाडाची घरे*
ऑटो चालकांनी माझ्याकडे घराची मागणी केली होती. श्री. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना विनंती केली आणि ऑटो चालकांना साडेचार लाखांत घरे देण्याचा निर्णय झाला. १०० ऑटो चालकांना घरे मिळाली. पण, आज केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे याच संदर्भात बैठक सुरू आहे. चंद्रपूरमध्ये गरीब लोकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून दहा हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यातील ३ हजार घरांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये एक संपूर्ण इमारत ऑटो चालकांसाठी असेल, अशी माहिती ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासोबतच मृत ऑटो चालकांच्या १८ ते ३० वर्षे वयाच्या मुलींसाठी स्वयंरोजरागाचा मार्ग खुला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

*ऑटो स्टॅण्डची गुणवत्ता राखा*
ऑटो स्टॅण्डचे काम दर्जेदार राहील आणि वेगानेही होईल, याची काळजी घ्या. राज्यातील सर्वोत्तम ऑटो स्टॅण्ड म्हणून ओळख असली पाहिजे. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची, सोलारची व्यवस्था राहील असे बघा. चंद्रपूरचा गौरव आपल्याला टिकवावा लागणार आहे. त्यादृष्टीने स्टॅण्डचे काम दर्जेदार व्हावे म्हणून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना निमंत्रित करून बैठक घ्या, अशा सूचनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

*बारामतीच नव्हे चंद्रपूरही प्रगत*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीमधील कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये येऊन गेले. एका कामाच्या निमित्ताने इथे आले असताना त्यांनी चंद्रपूरमधील सैनिक शाळा, बोटॅनिकल गार्डन, पोंभूर्णा येथील नगरपंचायत, खुले स्टेडियम, वन अकादमी, ताडोबा बघितले आणि त्यांना कमालीचा आनंद झाला. ते मला भेटायला आले आणि म्हणाले, ‘आम्हाला वाटायचं बारामतीच प्रगत आहे, पण चंद्रपूर बघून विश्वास बसला की केवळ बारामती नव्हे चंद्रपूरही प्रगत आहे.’ त्यांच्या सच्च्या भावना चंद्रपूरचा गौरव वाढविणारी बाब आहे.

*६९ लक्ष ३९ हजार रुपयांचा निधी*
महाराष्‍ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे प्रधान डाकघर, पाण्‍याच्या टाकीचा स्टॅण्ड व मुख्‍य बस स्थानकाच्या ऑटो‍रिक्षा स्टॅण्डवर ऑटो उभे करण्‍याकरिता स्‍थायी स्‍वरुपाचे स्टॅण्ड ऑटोरिक्षा चालकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्‍तांना सूचना करुन पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅण्ड येथे टिनाचे शेड तातडीने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे असे निर्देश दिले. त्यामुळे नगरोत्‍थान योजनेंतर्गत या कामासाठी ६९ लक्ष ३९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!