डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वरुर रोड येथे अभिवादन…

281

राजुरा: तालुक्यातील वरुर रोड येथील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाचनालयातील विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढून त्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी वरुर रोड येथील उपसरपंच्या सौ. विजया करमनकर, बेबीनंदा बोरकर, लईजाबाई रामटेके, विमलाबाई निरांजने,प्रकाश बोरकर,बालाजी करमनकर, वाचनालयातील स्वप्नील जीवतोडे, प्रज्वल बोरकर, मयूर जानवे, सागर बोरकर, प्रवीण चौधरी, श्रुती बोरकर,समीक्षा मोडक यासह अनेक विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.