Homeचंद्रपूरजिवतीटेकामांडवा केंद्रशाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा'

टेकामांडवा केंद्रशाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा’

जिवती (ता.प्र.) : समग्र शिक्षा समावेशित शिक्षण पंचायत समिती जिवती अंतर्गत जागतिक दिव्यांग दिन जि प के प्रा शा टेकामांडवा पं स जिवती येथे साजरा करण्यात आला।

आरोग्याच्या समस्या, शिक्षणातील समान संधींचा अभाव आणि बऱ्याचदा कामात होणारा त्रास या गोष्टींचा दिव्यांगाना सतत सामना करावा लागतो, यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर तसेच शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच, जगाला त्यांच्या समस्यांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी समाजात पूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बी डी ओ भागवत रेजिवाड व बी ई ओ सुनील झोडे यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा समावेशित शिक्षण पंचायत समिती जिवती, जि प प्रा शा टेकामांडवा व गुणवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ।सर्वप्रथम गावातून दिव्यांग विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर प्रभात फेरी शाळेमध्ये आल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम घेण्यात आला।यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून त्यांना पारितोषिकही देण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लचू पवार मु अ टेकामांडवा तर उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच सौ शुभांगीताई राऊत या उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून किसन बावणे केंद्रप्रमुख,प्रमुख अतिथी म्हणून प्रतीक गुडेपवार विशेषतज्ञ,अंकुश राठोड साधनव्यक्ती, ज्योती आत्राम विशेष शिक्षक केंद्र पाटण, उत्तम देवकते विशेष शिक्षक केंद्र शेनगाव, दत्ता गोतावळे विशेष शिक्षक केंद्र टेकामांडवा, गीते सर,उषा डोये, मुखळा मल्लेलवार सहशिक्षिका हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक गुडेपवार विशेषतज्ञ यांनी केले तर सूत्रसंचालन दिपक गोतावळे यांनी व आभार प्रदर्शन रुपेश मांदाळे यांनी केले। दिनांक 4 डिसेंबर ते 9 डिसेंबर यादरम्यान दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे।

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!