Homeचंद्रपूरप्राथमिक शिक्षण विभागास दोन महिन्‍यांचा अल्टिमेटम आमदार सुधाकर अडबाले : प्राथमिक शिक्षकांच्या...

प्राथमिक शिक्षण विभागास दोन महिन्‍यांचा अल्टिमेटम आमदार सुधाकर अडबाले : प्राथमिक शिक्षकांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा

चंद्रपूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्‍तार अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍याबाबत जिल्हा परिषदेत शुक्रवारी शिक्षकांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा पार पडली. या बैठकीत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या प्रलंबित सर्व समस्या दोन महिन्यांच्या आत सोडविण्याच्या सूचना केल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाकर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गायकवाड, समाज कल्‍याण अधिकारी पेेंदाम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्‍यनेते विजय भोगेकर, राज्‍य सरचिटणीस हरीश ससनकर, महिलामंच राज्‍याध्यक्ष अल्‍का ठाकरे, जगदीश जुनघरी, दिलीप मोरे, प्रकाश गौरकार, विजय हेलवटे, प्राथमिक शिक्षक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, समस्याग्रस्त कार्यरत – सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यरत – सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित सामुहिक व वैयक्तिक प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व याच विषयांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आढावा बैठक घेणार असल्‍याचे निर्देश आमदार अडबाले यांनी प्राथमिक शिक्षण विभागास दिले.

या सभेत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्‍यांवर चर्चा करण्यात आली. उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्ती करणे, चटोपाद्याय वेतन श्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी चालू ठेवणे व भविष्यात अतिप्रदान वसुली न करणे, सन २०२२-२०२३ प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेमध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करणे व प्राथमिक शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करणे व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शाळेत पदस्थापना देण्याबाबत, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्याबाबत, सन २०२२-२०२३ चे शाळांना सादिल खर्च,  DCPS/NPS धारक कर्मचाऱ्यांना प्राण नंबर देणे. त्यांच्या NPS पावत्या वितरणाची सद्यस्थिती, शिक्षकांच्या GPF पावत्या वितरणाची सद्यस्थिती, प्रलंबित वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याबाबत, सेवानिवृत्ती प्रकरण तात्काळ निकाली काढणे व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या GPF अंतिम प्रदान, अंश राशीकरण, उपदान व गटविमा, सेवानिवृत्त शिक्षकांकडून करण्यात आलेली संगणक वसुली व नक्षल भत्ता परत करण्याबाबत व इतर प्रलंबित समस्‍यांवर चर्चा करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!