माजरी येथील १२५ आदिवासी कुटुंबाना ३० दिवसाच्या आमरण उपोषणानंतर मिळाला न्याय भीम आर्मीच्या सुरेंद्र रायपुरे यांच्या लढ्याला यश

321

चंद्रपूर : माजरी येथील सर्व्हे क्रमांक 20 नारायण सिह उइके नगर येथे मागील 75 वर्षांपासून आदिवासी समाजातील 125 कुटुंब राहत होते. 2011 ला ती जमीन वेकोली प्रशासन ने अधिक्रमित केली आणि तेव्हापासून या आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास सुरु झाला. खुल्या खदानी मुळे खाणीतून निघणारी माती यांच्या घराच्या चारही बाजूला टाकण्यात आली होती. त्यामुळे पाण्याला जाण्याचा मार्गच बंद झाला आणि खाणितील सांडपाणी व पावसाचे पाणी याने थैमान घालून दरवर्षी याचे ते 125 घरे पाण्याखाली येत होती.

घरातील सर्व सामान त्या पाण्याने खराब होत होती. काही दिवसांपूर्वी एकाचा घरात साचलेल्या पाण्यामुळे विजेचा झटका लागून मृत्यू झाला तर काही लोकांचा साप आणि विंचू यांच्या दवंशाने. बाराही महिने ते पाणी तसेच साचून वाहत राहते ज्यामुळे त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशी दयनीय अवस्था झाली आहे.

ब्लास्टिंग मुळे घरास मोठ मोठे भेगा पडलेल्या आहेत. ज्यामुळे ते घर कधी ढसाळतील आणि कधी त्या धिगाऱ्यात दबून लोकांचा मृत्यू होईल याचा नेम नव्हता. सर्व खासदार आमदार मंत्री यांच्या कडे जाऊन देखील न्याय मिळत नव्हता. सर्व अधिकारी, नेते यांच्या ऑफिसच्या पायऱ्या घासून झाल्या पण काही कुणी कामी आली नाहीत. शेवटी सुरेंद्र रायपुरे याचे कार्य आणि नै्तृत्व बघता ते त्यांना भेटायला गेले आणि त्यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाची 30 आक्टोम्बर रोजी सुरवात केली.

दिवाळी सारखा सण संपूर्ण भारतीय साजरा करीत होते आणि हे आदिवासी बांधव तसेच भीम आर्मी जिल्यातील चमू तिथे आमरण उपोषनाच्या पेंडाल मध्ये बसून न्यायाच्या प्रतीक्षेत होती. सरकारी सुट्ट्याच्या कारणाने तब्ब्ल 30 दिवसाच्या आमरण उपोषणा नंतर जिल्हाधिकारी साहेब यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बैठक लावली व आदिवासी बांधवाना न्याय दिला.

20 कलमी सभागृहात मा. जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी वेकोली प्रशासनास आदेश दिला कि जरी तुमच्या नियमात बसत नसेल तरी सी एस आर फंडाच्या माध्यमातून या आदिवासी 125 कुटुंबाचे पुनर्वसन आपणास करून देणे भागच आहे. कारण एकतर ते आदिवासी आहेत आणि 75 वर्षांपासून ते तिथे वास्तवित आहेत. त्याचे वास्तव्य व पुनर्वसन तुम्हास नाकारता येणार नाही. त्यामुळे त्या परिसरापासून 2 ते 3 किलोमीटर च्या आत वेकोली प्रशासन यांनी जागा उपलब्ध करून दयावी असा लेखी आदेश दिला तसेच शबरी घरकुल योजने अंतर्गत 6 ते 7 महिन्याच्या आत घर बांधून देण्याचे पण लेखी स्वरूपात आश्वासन दिले.

सदर आश्वासन मुळे गावात आनंदाचे वातावरण आहे आणि तो आनंदोत्सव या आदिवासी बांधवानी सुरेंद्र रायपुरे यांना माजरी येथे बोलावून आपल्या मूळ पारंपरिक वाद्य आणि नृत्याचे सादरीकरण करीत रॅली काढून शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले.