समाजकार्य विद्यार्थ्यांनी जागतिक एड्स दिवस निमित्त काढली रॅली ‘संयम पाळा एड्स टाळा’ घोषणांनी केली जागृती

225

विशाल शेंडे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर – स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर च्या वतीने एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथून रॅली काढली.

दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस पाळला जातो. एड्स हा एक अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यावर आतापर्यंत कोणताही इलाज सापडलेला नाही. उपचाराशिवाय ते एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत करू शकते. हा रोग इम्युनो डेफिशियन्सीमुळे होतो. यामध्ये बहुतेक लोकांचे अवयव काम करणे बंद करतात आणि त्याला कोणत्याही आजाराचा अगदी लगेच संसर्ग होतो. म्हणून या विषयी जागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.

रॅलीचे समन्वयक प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे, प्रा.संतोष आडे, प्रा. डॉ. किरणकुमार मणुरे उपस्थित होते. यावेळी वैद्यकिय व मन:चिकित्सक समाजकार्य विशेषी करणाचे विद्यार्थी सहभागी होते.