चंद्रपूर: येथील विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 येथील हनुमान मंदीरात मागील दिनांक.20ऑक्टोबर.2023 ते दि.27नोव्हेंबर.2023 पर्यंत काकड आरती महोत्सव सुरू आहे.आज सोमवारी कार्तिक पौर्णिमा निमित्य सकाळी 6 वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येत आहे. मिरवणूक वॉर्डभर फिरून गांधी चौक मार्गे पठाणपुरा येथील नदी संगमावर विसर्जन करण्यात येत आहे.त्यानंतर बुधवारी (ता.28) सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विठ्ठल भक्ताने महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे हनुमान वारकरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी आवाहन केले आहे.तसेच सचिव नागेश देशमुख,कोषाध्यक्ष,विनोद कार्लेकर, काकड आरती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर बुटले,कार्याध्यक्ष,यक्ष तुळशीराम आंबटकर,उपाध्यक्ष विनोद शेरकी,सचिव नितीन बोडके,कोषाध्यक्ष शशिकांत नागापुरे,सह कोष्याध्यक्ष राहुल पाल,सह सचिव संतोष वाकुलकार,अशोक नवघडे,मुकेश धोडरे,गणेश भेंडारे,संतोष कूडे,संजय बानकर, विलास सातपुते,नितीन चनकापुरे,अनिल चनकापुरे,बंडू जवादे,विनोद बानकर,विजय नागापुरे, चंदू म्हशाखेत्री यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे…







