Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी रस्त्याच्या कुचकामी बांधकामाविरोधात काँग्रेसचे चक्का जाम आंदोलन.... महिनाभरात काम...

गोंडपिपरी रस्त्याच्या कुचकामी बांधकामाविरोधात काँग्रेसचे चक्का जाम आंदोलन…. महिनाभरात काम पूर्ण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगिती…

गोंडपिपरी- धाबा – हिवरा या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळून चार वर्ष पूर्ण झालीत.मात्र अद्यापही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही.गेल्या चार महिन्यांपासून रोडवर गीट्टी पसरवून ठेवल्याने दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ झाली.कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या दिरंगाई मुळे रस्त्याची अधोगती झाली आहे दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात गावाकडे येणाऱ्या पाहुण्यांनी रस्ता खराब असल्याने पाठ फिरवली. या सर्व गंभीर बाबीकडे गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीने आज डोंगरगाव फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

सकाळी ११:०० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. वाहतुकी दरम्यान अत्यावश्यक इमर्जन्सी सेवा वगळून दररोजच्या वाहतुकीस तीन तास रोखत तालुका काँग्रेस कमिटीने कंत्राटदार व प्रशासनाविरुद्ध शांततेत रोष व्यक्त केला. तांगडे साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांनी एक महिन्यात काम पूर्ण होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.ब्रीड अन्युएटी अंतर्गत २०१९ मध्ये गोंडपिपरी – धाबा या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली.जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कामाचे भूमिपूजन केले.मुल पोडसा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला काम देण्यात आले.मात्र चार वर्ष लोटून देखील कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही काम पूर्ण झालेली नाही. सदर महामार्गावर थातूरमातूर गिट्टी टाकण्यात आली असून या गीट्टीमुळे मार्गावर अनेक अपघाती घटना घडल्या आहेत. या अपघातात अनेकाचे जीव सुद्धा गेलेले आहेत.या महामार्गावर धुळीचे साम्राज्य असल्यामुळे अनेकांना श्वासोस्वाच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. धुळीच्या आजाराने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

तालुक्यातील धाबा गावाजवळील डोंगरगाव-फाटा या ठिकाणी (दीं.२१) रोजी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. तीन तास वाहतूक ठप्प करण्यात आली.धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागलोत तथा लाठीचे ठाणेदार यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला. तहसीलदार शुभम बहाकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता येडे सर तथा कंत्राटदाराचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता तांगडे चंद्रपूर यांनी आंदोलन स्थळी भेट देत महिन्याभरात काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले.तब्बल तीन तास शांततेत चाललेल्या आंदोलनाला अखेर स्थगित करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते अभिजित धोटे, तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,कार्याध्यक्ष निलेश संगमवार, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे,शहर अध्यक्ष राजू झाडे, युवक काँग्रेस अध्यक्ष विपिन पेद्दूलवार, अशोक रेचनकर, देविदास सातपुते,नामदेव सांगडे, श्रीनिवास कंदनुरीवाऱ, तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम,महेंद्र कुनघाटकर, गौतम झाडे, सचिन फुलझेले,संतोष बंडावार,महिला काँग्रेस अध्यक्ष सोनी दीवसे,जिल्हा महासचिव रेखा रामटेके,नगरसेवक वनिता वाघाडे,प्रा.शंभूजी येल्लेकर,बबलू कुळमेथे, तुकेश वानोडे,सारनाथ बक्षी,शालिक झाडे, वैभव निमगडे,जितेंद्र गोहणे, अनील कोरडे, संतोष मूपिडवार, रामकृष्ण सांगडे,आशिष निमगडे, बालाजी चनकापुरे, धिरेंद्र नागापूरे,अनुराग फुलझेले,सोनल झाडें, आनंद कोडापे, अनिल झाडे, प्रकाश हिवरकर,दिलीप पुलगमकर, शंकर येलमुले,जगताप सरपंच, वाघाडे भाऊ,यासह मोठ्या संख्येनी काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष म्हणजे आंदोलनात शालेय विद्यार्थी सहभागी झालेत रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे धाबा – पोळसा क्षेत्रातील विद्यार्थी यांना ने – आन करण्याकरिता बस देखील या मार्गाने गाडी टाकीत नाही.त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यावर येऊन ठेपली आहे.कंत्राटदार व प्रशासनाविरुद्ध या आंदोलनात विद्यार्थी देखील सहभागी झाले.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!