Homeचंद्रपूरराजुरास्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलची खेळाडूं राज्यस्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत भाग घेणार

स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलची खेळाडूं राज्यस्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत भाग घेणार

राजुरा: विभाग स्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत बामणवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूची राज्य स्तरीय शालेय सायकलींग स्पर्धेकरिता निवड
क्रीडा व युवक संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया तथा गोंदिया जिल्हा सायकलींग संघटनेच्या वतीने, देवरी, गोंदिया येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय शालेय सायकलींग स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या गटात कु. अनुष्का भास्कर फरकाडे हिने टाईम ट्रायल 5 कि. मी. 12 मिनिटामध्ये पूर्ण करित प्रथम क्रमांक पटकावला तिची पुणे येथे होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय सायकलींग स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या खेळाडूला शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री भास्कर फरकाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रभा डि. एम. संस्थेच्या सचिव सिस्टर रिता डि. एम. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी श्री संदिप उईके सर,श्री. विजय ढोबाळे सर, श्री मनोज पंधराम सर, सायकलींग संघटनेचे सचिव श्री दिलीप बिस्वास सर, शाळेचे सर्व शिक्षक वृंध व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व भविष्यात ही अशीच कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!