गोंडपीपरी: तालुक्यातील काँगेस कमिटीत अनेक वर्षापासून शहर अध्यक्ष पदाची भूमिका पार पाडत पक्ष वाढीसाठी विशेष योगदान दिलेले गोंडपिपरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. देवेंद्रजी बट्टे यांचे अनुभवी कार्य लक्षात घेता व काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठा बघुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी देवेंद्रभाऊ बट्टे यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन तसे नियुक्तीपत्र प्रदान केले. व आदरणीय सोनियाजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांचे मार्गदर्शनात संघटन वाढवणे करीता उत्तम योगदान राहील अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान आज देवेंद्रजी बट्टे यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देताना गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष सोनिताई दिवसे उपस्थीत होते.