Homeचंद्रपूरराजुरापालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फुगडीपठार येथील अनेक कार्यकर्त्यांचा...

पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फुगडीपठार येथील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

राजुरा: तालुक्यातील फुगडीपठार येथील शेकडो कार्यकर्त्यांनी काल (दि. ०८) रोजी भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून गावातील अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्षांना खिंडार पडले आहे.

पक्षप्रवेशामध्ये, ऋषिकेश वाटगूरे, इशन कोटनाके, अर्जून किन्नाके, राहुल कोटनाके, सुनिल वाटगूरे, विशाल गुरनूले, सागर चावरे, आशिष नागोसे, अविनाश नागोसे, मनोज आदे, शंकर ठाकरे, संदिप आदे, गौरव गुरनूले, रामराव कोटनाके, अविनाश गुरनूले, राजेश कोटनाके, विक्रम कोटनाके, गंगाधर गुरनूले, विकास सिडाम, वासुदेव सिडाम, भाऊराव उईके, संतोष गुरनूले, भिमराव कन्नाके, अखिल कोटनाके, जिवन राऊत यांचेसह मोठ्या संख्येने स्थानिकांचा समावेश होता.

या सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी भाजप परीवारात सहर्ष स्वागत केले. यासोबतच येत्या काळात गावाच्या विकासासाठी सर्वांनी सक्रियतेने पुढाकार घ्या. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व जामणी व फुगडीपठार गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तुमच्या सोबत आहोत. असा विश्वास ही देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

यावेळी, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, संजय उपग्नालावार वामन तुराणकर, विनोद नरेन्दुलवार, उपसरपंच गणेश नैताम, नथ्थु निकोडे, अशोक चांदेकर, शंकर आदे, शंकर रामटेके, ईसंबर नागोसे, शुभम मेंढे, अशोक कोटनाके, मनोहर राऊत, बेबीताई कोटनाके, सुनिताताई गूरनूले आदिंची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!