भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी दिली ग्रामिण रुग्णालय, राजुराला भेट..

242

राजुरा : भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी आज सकाळी राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला.प्रसंगीच, रुग्णांचीही भेट घेत आस्थेने विचारपुस केली, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जानून घेत त्यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सुचना वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.

रुग्णालयात असलेल्या औषध साठा, यंत्रसामुग्री, जुन्या इमारतीची डागडुजी इ. बाबतची ही पाहणी त्यांनी यादरम्यान केली.यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, सुरेश रागीट, सचिन डोहे, विनोद नरेन्दुलवार, दिलीप गिरसावळे, माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जयपुरकर, सौ. प्रितीताई रेकलवार, सौ. शितलताई वाटेकर, शंकर धनवलकर, सिनू पांजा, डॉ. जाधव, डॉ. शेख, छबिलाल नाईक, दिपक झाडे, वैभव पावडे आदिंसह राजुरा शहरातून अनेकांची त्यांसमवेत उपस्थिती होती.