चंद्रपूर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कार्यालय – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर तथा सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर तर्फे ग्रा. प. पांढरकवडा, घुग्गुस रोड येथे मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार आणि मानसीक आरोग्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराचा ज्येष्ठ नागरीकानी लाभ घेतला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राम स्वच्छतेने करण्यात आली.
यावेळी सरपंच सुरज तोतडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत तर्फे नियमित कार्यक्रम घेतले जातात. ज्येष्ठांना त्यांच्या आरोग्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर बोलतांना प्रा. डॉ. ममता ठाकूरवार म्हणाल्या, वयाच्या ६० वर्षानंतर ज्येष्ठ नागरीकाना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वयात त्यांना कुटुंबातील सदस्यांच्या संवादाची आवश्यकता असते. यानंतर प्रा. डॉ. कल्पना कवाडे यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरीकांचे मानसिक आधार सक्षम करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. नितीन रामटेके यांनी केले. यावेळी समाजकल्याण विभागाच्या निरीक्षक पुनम आशेगावकर, डॉ. कौशल्या अडवाणी , डॉ. किरण देशपांडे, धनंजय तावाडे, प्रा. सुभाष गिरडे यांची तर समुदाय विकास विशेषीकरण समाजकार्य आणि मन:चिकित्सक समाजकार्य विशेषीकरण विद्यार्थी स्वप्नील मेश्राम, चंद्रशेखर ओशाखा, धीरज शेंडे, गौरव झाडे, शिवानी शेंडे, सेजल निखाडे , सेजल चांदेकर, सपना इटनकर यांची उपस्थिती होती. संचालन नितेश वाघाडे तर आभार प्रतिक्षा माऊलीकर हिने मानले.