अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  आनंद निकेतन महाविद्यालयात व्याख्यान संपन्न…

314

वरोरा: महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित आनंदनिकेतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक गुंतवणूक भविष्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 27 सप्टेंबर 2023 ला व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी, “प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य असते, आपल्यातील या कलागुणांना व शक्तीला जागृत करून आपण आपले जीवन देदीप्यमान केले पाहिजे” असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री सिद्धेश्वर बुरान, संचालक, शिवाय जॉब कन्सल्टन्सी यांनी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे . तसेच श्री गणेश गिरडकर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले होते. कुठलेही काम करताना कामाची लाज न बाळगता ते काम स्वतः करून त्या कामातून इतर मुलांना रोजगार निर्माण करून द्यायला पाहिजे असे मोलाचे विचार सांगितले.

अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकेमधून शिक्षणातील गुंतवणूक ही देशाच्या भविष्यासाठी उपयोगी पडणारी गुंतवणूक असते. सर्वाधिक तरुणाचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात डोक्याला खाद्य आणि हातांना काम नसणारा तरुणांची संख्या वाढली तर काय अराजकता माजेल याची कल्पनाच घाबरवणारी आहे असे विचार व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात मेरिट आलेले आनंद निकेतन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी श्री हितेश घुगल यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. अर्थशास्त्र विभागातील प्रा. तनुजा वैद्य ,प्रा.मनीषा बारसागडे, प्रा. पल्लवी जीवतोडे व प्रा. सागर मांडवकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ए अर्थशास्त्र भाग 2 ची विद्यार्थिनी कु. पल्लवी दडमल हिने तर आभार प्रदर्शन कु.प्रतीक्षा दडमल यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. मोक्षदा नाईक, प्रा .आशिष येटे , प्रा. संदीप ताजने यांनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.