वरोरा:- तालुक्यातील उखर्डा ते नागरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठे मोठे खड्डे पडले आहेत याचा परिमाण वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. या मार्गाने लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. शाळेची बस या खड्ड्यांमुळे बंद झाली पूर्ण बस, गाडी चे टप्पर फुटतात यामुळे लोकांमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जनता त्रस्थ झाली आहे. अनेक निवेदन दिले. आंदोलन केले त्या नंतर उखर्डा ते नागरी रस्ता मंजूर झाला आहे पण उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याची पार वाट लागली आहे. लोकांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहे. या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे चालक कंटाळून गेले आहे. गाडीचे पार्ट खाली तुटून पडत आहे इतकी भयानक अवस्था रस्त्याची झाली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपेत आहेत, मुर्दाड प्रशासनाला जाग कधी येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत, खड्डे आहेत की तलाव अशी अवस्था झाली आहे.या मुळे प्रामुख्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत बस अचानक बंद पडल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)युवासेना अभिजित कुडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या पालकांना संपर्क करून त्यांना गावाला पोहचवले व स्वताच्या गाडीने काही विद्यार्थ्यांंना सोडून दिले. महाडोळी येथील विद्यार्थ्यांंना 2 शब्द प्रेमाचे येथील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाला बोलले. या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनानेच करायचे काय असा प्रश्न पडतो आहे. आता यांना सडो की पडो करून सोडू व मोठे जन आक्रोश आंदोलन तसेच प्रत्येक गावात लक्षवेधी आंदोलन करू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला. प्रशासनाने 1 महिन्यात तालुक्यातील रस्त्याची अवस्था दुरुस्त केली नाही तर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे यावेळी साहिल पानतावणे, ऋषिकेश कुडे,पंकज डोमकावळे, प्रणय देवतळे, रोशन भोयर, राहुल डोमकावळे व विद्यार्थी उपस्थित होते. ..







