चंद्रपूर, राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत 17 सप्टेंबरला गांधी चौक येथून निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
आज स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेत तेली समाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी शेकडो तेली समाज बांधव उपस्थित होते.
बैठकीत बोलताना तेली समाजाचे नेते प्रा. सुर्यकांत खनके यांनी सांगितले की, मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. त्या मुळे तेली समाज रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करणार आहे.
याप्रसंगी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके, प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ तेली समाज महासंघ शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, ओमप्रकाश पोटदुखे, रवींद्र जुमडे, प्रा. पांडुरंग मोहरकर, भूपेश गोठे, नरेंद्रजी बुरांडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, गणेश येरणे, यश बांगडे, अशोक रहाटे, चंद्रशेखर घटे, मनीष खनके, नितेश जुमडे, योगेश देवतळे, सचिन किरमे, गणेश तिघारे, पुरुषोत्तम मोगरे, अजय खनके, गोपीभाऊ खोब्रागडे, हरिदास नागपुरे, संजय कुकडे, सुनील बुटले, भूपेंद्र खनके, भरत कुंडले, संजय बिजवे, गणेश पोहाणे, विनोद निखाते, अक्षय किरमे, ॲड. मुरलीधरराव बावनकर, उमेश मोगरे, कैलास राहटे, ओमप्रकाश पोटदुखे, प्रा. पांडुरंग मोहरकर, महेश टीपले, मनीष तपासे, सुभाष निखाते यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित असलेल्या तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की, 17 सप्टेंबरला निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात संपूर्ण तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल.
बैठकीत तेली समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तेली समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.