Homeचंद्रपूरआमदारांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील खराब रस्त्याने येणार काय:- अभिजित कुडे वरोरा तालुका...

आमदारांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील खराब रस्त्याने येणार काय:- अभिजित कुडे वरोरा तालुका झाला  खड्डेमय…

वरोरा: तालुक्यातील सर्व रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या 5 वर्षात विकास कुठे हरवला आहे याचा शोध सर्व सामान्य माणूस घेत आहेत. कुणी रस्ता देता का रस्ता अशी अवस्था आहे. खड्डय़ात आंघोळ करू शकतो या प्रकारे रस्त्यातील खड्डय़ात पाणी साचले आहे. रस्ता आहे की स्विमिंग पूल हा प्रश्न पडतो आहे. संपूर्ण तालुका खड्डेमय झाला आहे तर आमदारांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील खराब रस्त्याने येणार आहे का असा प्रश्न अभिजित कुडे यांनी उपस्थित केला आहे. खराब रस्त्यामुळे बससेवा बंद होत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. एक नाही तर संपूर्ण तालुक्यात हेच चित्र आहे. कित्येक निवेदन दिले आंदोलन केले तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही. 41 गावातील रस्त्यासाठी निवेदन दिले गेल्या 3 वर्षात फक्त काही रस्त्याची डागडुजी करून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांची घर भरण्याची काम चालू आहे. लोकांमधे प्रचंड आक्रोश आहे. जनता त्रस्त झाली आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांंना सहन करावा लागतो आहे. अनेक गावातील बससेवा बंद करावी लागली आहे त्यामुळे जीव धोक्यात घालून खासगी वाहनांची विद्यार्थी प्रवास करायला नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करून शाळा कॉलेज ला जात आहे. झोपा काढत असलेल्या प्रशासनाला धारेवर धरले तरी निधी उपलब्ध नाही म्हणून रस्त्याचे काम थांबले आहे. मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नाही आहे. रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हा प्रश्न पडतो आहे. अनेक अपघात घडत आहेत. लोकाना मानेचा कंबरेचा त्रास वाढला आहे. लोकांच्या गाड्यांची टप्पर फुटतात इतके सुंदर रस्ते आहे. लोकप्रतिनिधी झोपेत आहे का त्यांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही काय? स्विमिंग पूल तयार केले आहे असे रस्ते आहे. खड्डे भरल्याच्या नावावर चिखल करून ठेवला आहे. 21 आंदोलन केले. पण उदासीनता आली आहे. तालुक्याला वाळीत टाकले आहे का प्रश्न उद्भवला आहे. मात्र लोकप्रतिनिधी जनसंवाद यात्रा काढत आहे त्यांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील या खराब रस्त्याने येणार का? नागरी, माढेळी, उखर्डा, केळी, महाडोळी, हीवरा, पवणी, वाघनख, येवती, बामर्डा, वडगाव, चीकणी, शेगाव, नागरी स्टेशन, आजनगाव, वडगाव, बोपापुर, चारगाव, दादापुर, जडका, कोसरसार, बोडका तालुक्यातील सर्व अंतर्गत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या सर्व रस्त्यासाठी गेल्या 2 वर्षात कित्येक निवेदन दिले आंदोलन केले तरी मुर्दाड प्रशासन व लोकप्रतिनिधी झोपेत आहे. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!