Homeचंद्रपूरअमली पदार्थ विक्री करतांना १६,४९,१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त... स्थानिक गुन्हे शाखा...

अमली पदार्थ विक्री करतांना १६,४९,१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची कारवाई…

चंद्रपुर: जिल्हयात अमली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्था.गु. शा. चंद्रपुर यांना आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना एक विशेष पथक तयार करुन कार्यवाही करन्याचे सुचना दिल्या.

त्यानुसार दि. 01/09/2023 गोपनीय माहीती मिळाली की, बल्लारशा बायपास रोड चंद्रपुर येथे एका पांढऱ्या रंगाची स्कॉरपीओ गाडी क्र. एम.एच. 33 ए.सी. 1101 मध्ये काही संशयित इसम हे अमली पदार्थ आणुन ते विक्री साठी गिन्हाईक शोधत आहेत.

या माहीती वरून विशेष पथकाचे पो. उ. नि. अतुल कावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर गाडीचा शोध घेण्यासाठी सापळा रचला. यावेळी संशयीत वाहनाचा बल्लारशा बायपास रोडने शोध घेत असताना संशयीत वाहन बजाज विद्या निकेतन शाळेच्या समोर उभे असल्याचे दिसुन आले.

संशयित वाहन दिसून आल्यावर पोलिसांनी त्या वाहन चालकास विचारपूस केली. परंतु विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे न देता वाहनचालकाने उडवाउडविचे उत्तर दिले. यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एका निळया प्लॅस्टीक पन्नी मध्ये अंदाजे 5.213 ग्रॅम किंमत अंदाजे 52,130 /- रू. चा गांजा अमली पदार्थ दिसून आला. यासोबतच सदर गुन्हामध्ये वापरलेले वाहन किमंत अंदाजे 15,000,00/- रू. आरोपीचे तिन मोबाईल किमंत अंदाजे 97,000/- रू असा एकुण 16,49,130 /- रू मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यामध्ये यश राज दुर्योधन (वय18 वर्ष), नेहाल इकरार ठाकुर (वय 21 वर्ष), संगिर खान ननुआ खान (वय 32 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. यांच्यावर कलम 8 (क), 20 (ब) (ii) (ब), 41,43. एन.डी.पी.एस., 34 भादवी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन. डी.पी.एस.) 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे. रामनगर हे करीत आहे.

सदर कार्यवाही रविंद्र परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, रिना जनबंधू अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, नंदनवार साहेब उपविभागिय पोलीस उधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पो.उप नि. अतुल कावळे, पो. हवा. शकील शेख, नापोकों अनुप डांगे, मिलींद चव्हाण, नितेश महात्मे, जमीन पठाण, प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, चालक रूषभ बारसिंगे यांच्या पथकाने केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!