अपघातात एक ठार, तिघे जखमी… जिवती तालुक्यातील घटना

1035

बळीराम काळे (जिवती तालुका प्रतिनिधी)

गडचांदूर: दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर अन्य तिघे गंभीर जखमी आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३१) दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेणगाव येथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडली. नरपडा भीमराव गडमलु (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

जिवती येथून सासूबाई मैसुबाई येलय्या गुडेलु यांना दुचाकीने नरपडा गडमलू हे गावाकडे जात होते. शेणगाव येथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीची नरपडा गडमलू यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. या अपघातात नरपडा भीमराव गडमलु यांचा जागीच मृत्यू झाला. तर मैसूबाई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर, दुचाकीस्वार मरका गोंदी, मगदुम सय्यद हेसुद्धा जखमी झाले आहेत.

अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तातडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पुढील तपास सुरू आहे.