चेकदरुर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी शामराव भोयर यांची बिनविरोध निवड…!! सरपंच रवींद्र पाल व गावकऱ्यांनी केले नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन..

356

गोंडपिपरी: तालुक्यातील चेकदरुर ग्रामपंचायत मध्ये विविध विषयावर ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच रवींद्र पाल यांनी विविध विषयाचे वाचन करत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली.

दरम्यान दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची प्रत्येक गावागावात एक तृतीयांश नवीन पुनर्रचना केली जाते. त्यानुसार ग्रामसभेच्या तंटामुक्त समितीच्या विषयानुसार उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सहमताने श्री.शामराव रावजी भोयर यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करत तंटामुक्त समिती घोषित करण्यात आली.

ग्रामसभेचे अध्यक्ष व सर्व ग्रामस्थांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन केले. दरम्यान सभेला सरपंच रवींद्र पाल उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.