जनावरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक… वरोरा तालुक्यातील घटना…

743

वरोरा: पिकप वाहनांमध्ये जनावरे कोंबून त्याची तस्करी करत असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनास अडवले. वाहनासह 26जनावरे ताब्यात घेऊन गोरक्षणला दिली.अब्दुल नाजीम अब्दुल कुरेशी (वय 28), रितिक सावंत मेश्राम( वय 23 ) राजेंद्र भाऊराव सोयाम (वय 55),नेहाल राजेंद्र सोयाम (वय 26), एक विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.हे सर्व वरोरा येथील रहिवासी आहे.या पाच व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरोरा तालुक्यातील भटाळा गावाकडून सालोरी गावाच्या दिशेने एम एच 34 बीजी1632 या क्रमांकाच्या पिकप वाहनांमध्ये जनावरे कोंबून आणित असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन थांबून वाहनाची तपासणी केली. वाहनांमध्ये जनावरांना चारा पाण्याची सोय केली नाही. निर्दयतेने वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर वाहनचालकास विचारपूस केली.जनावरे विकत घेतल्याची पावती त्याच्याजवळ नव्हती. जनावरे सालोरी गावानजीकच्या शेतातील गोठ्यात घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी दिली. शेगाव पोलिसांनी या गोठ्याची पाहणी केली. गोठ्यामध्ये दहा जनावरे कोंबून ठेवली होती. वाहनातील आठ व गोठ्यातील 18 असे 26 जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये करण्यात आली.जनावरे कोंबून नेणाऱ्या वाहनासमोर एम एच 34 बी एल 53 13 या क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीने यातील एक व्यक्ती पायलेटिंग करीत होता. त्यालाही दुचाकीसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर कारवाई शेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव सुर जुसे गणेश मेश्राम आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.