वरोरा:- तालुक्यातील माढेळी ते निलजई रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. शेतकर्यांना शेतात जाण्यास करावी लागते जीवघेणी कसरत पावसाळ्यात रस्ता बंद होऊन शेतात जाता येत नाही. बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही. चिखल वाट तुडवत शेतात जावे लागते. या बाबत शेतकर्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना अभिजित कुडे याना माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते चंपतराव साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. कृषिप्रधान देशात शेतकर्यांना शेतात जायला रस्ता नाही ही शोकांतिका आहे अभिजित कुडे. 7 महिन्याचा आधी रस्त्याचे काम झाले असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून ठेवले आहे तात्काळ कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला. या रस्त्यामुळे काही दिवसा आधी खराब रस्त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अनेक अपघात घडत आहेत. शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी अभिजित कुडे, रोशन भोयर, सामाजिक कार्यकर्ते चंपतराव साळवे, सुनील कोहपरे, प्रमोद भोयर, अभिमान कोहपरे, जगन मासूरकर ,वासुदेव सहारे, अतुल कोहपरे, नारायण इंगोले, पंकज इंगोले उपस्थित होते..







