चंद्रपूर: दि 12/08/2023 रोजी मातोश्री सभागृह तुकुम चंद्रपूर येथे सर्व परिवर्तनवादी संघटनेचे वतीने प्रा हरी नरके व गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ सत्यशोधक हिराचंद बोरकुटे होते.
दि 6/08/2023 रोजी विद्रोही कवी गायक शाहीर तसेच तेलंगणा आंदोलनाचे नेते ज्यांनी आयुष्यभर अन्याया विरुद्ध आपल्या गीतातून आंदोलने करून लोक जागृती केली असे नायक गदर व दि 09/08/2023 रोजी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यात ज्यांनी आपले अमूल्य असे योगदान दिले बहुजन विचार तळागाळातील लोकपर्यंत पोहचविले त्यांचे संशोधन साहित्यात नवी दिशा दिली असे विचारवंत प्रा हरी नरके असे दोन महानायक आपल्यातून निघून गेले त्यांचे कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.
या प्रसंगी स्मृती व्यक्त करताना खुशाल तेलंग, किशोरभाऊ पोतनवार, नरेन गेडाम, बळीराज धोटे, ऍड पुरुषोत्तम सातपुते, डॉ राकेश गावतुरे, ऍड जयंत साळवे, प्रा इरादास भडके, प्रा कोमल खोब्रागडे, येशूताई पोतनवार, शहीदा शेख, छायाताई सोनूले, नेताजी भरणे, प्रा व्हेले सर, राजकुमार जवादे, सुरेंद्र रायपुरे, डॉ राजू ताटेवार, डी के अरीकर, अंकुश वाघमारे, प्रा माधव गुरनुले, प्रदीप अडकीने, अरुण धनोरकर, प्रा सुरेश लोनबले, अशोक बनकर, हंसराज वनकर , शंकर मांदांडे भाऊ, मयूरराई कवार, प्रा अनिल डहाके, रूपम निमगडे, पप्पूभाऊ देशमुख, एल व्ही घागी सर, विजय मुसळे, डॉ समीर कदम, डॉ दीपक जोगदंड, ऍड पुनमचंद वाकडे, पुरुषोत्तम बसुने, सुशील दहागावकर, श्रीनिवास गोलेवार, कृष्णदास गजभिये , किशोर तेलतुंबडे, सूर्यभान झाडे, प्रा टी डी कोसे, पुष्पा देशपांडे, माया दुपारे, अंजली मेश्राम, रेखा लेनगुरे, विजयकुमार, जांभूळकर ,सुधाकर खोब्रागडे , नितिन बनसोड संतोष डांगे , सुधाकर खोब्रागडे, ऍड प्रशांत सोनूले व सर्व परिवर्तन वादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.







