Homeचंद्रपूरराजुराराजुरा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न

राजुरा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न

राजुरा:ऑगस्ट २०२३ ला जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, राजुरा येथे मराठा सेवा संघ, चांदागड फार्मर प्रोड्युसर कंपनी व बळीराजा नागरी सहकारी पत संस्था द्वारा आयोजित साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयाचे उपाध्यक्ष, बळीराजा नागरी सहकारी पतसंस्था राजुराचे अध्यक्ष आणि मराठा सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि मार्गदर्शक मा. विजयभाऊ मोरे हे वेकोलीच्या सेवेतून निवृत्त व मा. धनराज कुळसंगे पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मोरे, प्रमुख अतिथी म्हणून चांदागड फार्मर प्रोडुसर कंपनीचे संचालक लक्ष्मण घुगूल, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, ममताताई मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचालन मधुकर डांगे यांनी व आभार प्रदर्शन मधूकर मटाले यांनी केले. सत्कारमूर्तीचा परिचय संभाजी साळवे यांनी करून दिला. कार्यक्रमाला वाचनालयाचे, बळीराजा पतसंस्थेचे संचालक चांदागड कंपनीचे संचालक, विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविका येमुलवार, विनोद बोबडे, राजू भोयर, लक्ष्मण तुराणकर, दिलीप गिरसावळे, मधुकर बोबडे, विनायक बोंडे, सुभाष अडवे, रामकीसन पारखी, नंदुभाऊ वाढई, प्रकाश उरकुडे यांनी परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!