गोंडपिंपरी: मागील कित्येक दिवसापासून पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.अशातच शेतमजूर शेतात काम करीत असताना वीज पडून एक ठार झाल्याची घटना घडली.गोविंदा लिंगा टेकाम (वय 53) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. गोंडपीपरी तालुक्यातील चीवंडा येथील शेतशिवरात गोविंदा टेकाम हा शेतमजूर काम करीत होता. दरम्यान विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेतात वीज कोसळली. यात गोविंदा टेकाम यांचा मृत्यू झाला.






