हिवरा: येथील ग्रामपंचायतिचे यापूर्वीचे ग्रामसेवक संतोष घाटे यांनी काही खाजगी कारणास्तव स्वतःची बदली करून घेतल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतिचा कामकाजाचा कार्यभार पी.डी.राऊत यांनी स्वीकारला. दरम्यान आज दिनांक २५-७-२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता हिवरा ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. आज मासिक सभेच्या निमित्ताने नवीन प्रभारी ग्रामसेवक श्री.पी.डी.राऊत यांचे ग्रामपंचायतच्या कमिटीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गाव विकासाच्या दृष्टिकोनातून आपण उत्कर्षाने काम करून कमिटीला व गावकऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे नवीन प्रभारी ग्रामसेवक पी.डी.राऊत यांनी सांगितले.यावेळी सरपंच निलेश पुलगमकर,उपसरपंच वर्षाताई कुत्तरमारे,सदस्य जितेंद्र गोहणे, सदस्या पुष्पाताई हिवरकर, सदस्या प्रतिमाताई आक्केवार, सदस्या अरुणाताई नेवारे, सदस्य देवानंद आक्केवार, शिपाई विद्याताई गुंडावार, शिपाई चेतन पुलगमकर, संगणक चालक उमेश पुलगमकर उपस्थित होते






