गरजूना वस्त्रदान व शिवण यंत्र वितरण समृद्धी तगपल्लेवार यांचे योगदान

452

चंद्रपूर – आपल्या वाढदिवसानिमित्य माय भूमितील निवडक गरजूना अंशीक का होईना मदत व्हावी करिता चंद्रपूरातील 2गरजू महिलांना शिवण यंत्र व पावसाळ्याचे अनुषंगाने निवडक युवतीना छत्री वितरण व दिव्यांग खुशाल ला वस्त्र व रेनकोट चे वितरण अलीकडेच विकलांग सेवा संस्था कार्यालयात संपन्न झाला. या उपक्रमासाठी श्री, संदीप व सौं, शिल्पा तगल पल्लेवार ह्यांनी त्यांची सुकन्या समृद्धी जी लंडन ला वैद्यकीय शिक्षण घेत असून तिचा वाढदिवस समाज हितार्थ व्हावा दृष्टीकोनातून मदत उपलब्ध करुन दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिमा दुपारे,, शिवानी बोबडे, पूजा पा न्हेरकर, सौं नंदा बिहाडे देवराव कोंडेकर, अशोक खाडे, राजश्री शिंदे,संजय डाखोरे पूजा राखोंडे प्रसाद पा न्हेरकर ह्यांनी योगदान दिले.