Homeचंद्रपूरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मानसी पिदुरकर अव्वल

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मानसी पिदुरकर अव्वल

चंद्रपूर__प्रचंड जिद्द,मेहनत आणि आत्मविश्वास अंगी असेल तर अशक्य गोष्ट शक्य करून दाखविता येते.चंद्रपूर येथील
मानसी प्रवीणराव पिदूरकर हिने अभ्यासासोबतच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. एका शहरी जलतरण तलावात प्रथमतः आपल्यालाच आव्हानाला प्रतिसाद देत जिल्हा पातळीवर नावलौकिक मिळविल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर ६-वे राष्ट्रीय फिनस्वीम चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा २३ जून ते २५ जून दरम्यान तीन दिवसीय जलतरण स्पर्धा इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, गौलापूर,हलद्वानी नैनिताल (उत्तराखंड) येथे घेण्यात आली.या १०० मीटर जलतरण (स्विमिंग) स्पर्धेत मानसीने तिसरा क्रमांक मिळवीत ब्राँझ मेडल पटकाविले आहे.तिने अभ्यासासोबतच आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना नेहमीच वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.ती चंद्रपूर येथील कार्मेल अकॅडमीची ९ व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. यासाठी तिचे वडील डॉ.प्रवीण पिदुरकर व आई सुचिता पिदुरकर यांनी अथक परिश्रम घेत मानसीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात तिला स्थान दिल्याने जलतरण क्षेत्रात तिने भरारी घेतली आहे. मानसी नेहमीच आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना नेहमीच वाव देण्यासाठी मेहनत करून धडपड करीत असते. मानसीची नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची धडपड कौतुकास्पद आहे .यातून तिने हे यश मिळविले आहे.तिने या यशाचे श्रेय तिचे आईवडील, प्रशिक्षक महेंद्र कपूर,तिचे मामा राजेंद्र पिंपळशेंडे,हेमंत पिंपळशेंडे, मामी योगिता पिंपळशेंडे,पुनम पिंपळशेंडे, व सर्व मित्र परिवार यांना दिले आहे.मानसीच्या या यशामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!