खळबळजनक! आत्महत्या करण्यासाठी बारमध्ये आला; तो वाचला पण वेटरनेच जीव गमावला! वाचा नेमकं काय घडलं?

1921

चंद्रपूर : ग्राहकाची अर्धी शिल्लक राहिलेली बीअर वेटरने पिल्याने वेटरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातल्या सोमनाथपूर मटण मार्केटच्या बाजूला असलेल्या लक्की बीअर बारमध्ये हा प्रकार घडला आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, राजुरा शहरातील (Rajura) एका बारमध्ये ग्राहक अभय लांडे (28 ) हा बिअर पिण्यासाठी आला होता. यावेळी त्याने सोबत आणलेले विषारी द्रव्य बियरमध्ये ओतले. हे विषयुक्त त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मधूनच बारमधून बाहेर पडला.

यावेळी टेबलवर शिल्लक असलेली अर्धी बीअर या बारमधील वेटर भगवान गेडाम याने नंतर प्राशन केली. यामध्ये त्याचा बारमध्येच मृत्यू झाला. या प्रकारानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रथमदर्शनी ग्राहक अभय लांडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विषयुक्त बिअर पिल्याने प्रकृती बिघडल्याने तो बाहेर पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तीच बिअर पिल्याने इकडे वेटरचा मात्र मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व बाजुंनी चौकशी सुरू केली असून रासायनिक परीक्षण अहवाल आल्यावर योग्य ते गुन्हे दाखल केले जाणार आहेत.