Homeगडचिरोलीआविसं संघटनला मोठा धक्का - रवी सुलतान यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

आविसं संघटनला मोठा धक्का – रवी सुलतान यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आविसंचा मोठा मासा लागला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला पक्ष प्रवेश करत नेत्याने आणला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सिरोंचा:-सिरोंचात आदिवासी विध्यार्थी संघटनेला जबरदस्त धक्का बसला आहे.आविसंचा मोठा मासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याने आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यात चांगली पकड निर्माण झाली होती. मात्र,काही महिन्यांपूर्वी माजी आमदार दीपक आत्राम यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचा झेंडा हाती घेतल्यावर आदिवासी विध्यार्थी संघटनेत फूट पडली.आदिवासी विध्यार्थी संघटना आणि भारत राष्ट्र समिती असे दोन गट निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न पडला. कोणत्या गटात जावे हेच कळत नसल्याने अंतर्गत राजकारणाला कंटाळून आदिवासी विध्यार्थी संघटना सोडत असल्याचे सांगून आविस चे शहर अध्यक्ष असलेले रवी सुलतान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

रवी सुलतान हे माजी आमदार दीपक आत्राम यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.एवढेच नव्हेतर आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा शहर अध्यक्ष आहेत.ते गेल्या 25 वर्षांपासून आदिवासी विध्यार्थी संघटनेत काम करत असून सिरोंचा तालुक्यात त्यांचा चांगलाच वजन आहे.नुकतेच एक ते दीड वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आदिवासी विध्यार्थी संघटनेला एकहाती सत्ता बसविण्यात खूप मोठं यश आलं होता. त्यात रवी सुलतान यांचा मोलाचा वाटा होता.

आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्यात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचेही चर्चा सुरू होती.अखेर रवी सुलतान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे.सिरोंचा येथील आविस च्या काही पदाधिकाऱ्यांना याची चुणूक लागताच त्यांनी रवी सुलतान यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.मात्र,रवी सुलतान यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

रवी सुलतान यांनी आदिवासी विध्यार्थी संघटनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ हातात बांधून घेतल्याने सिरोंचा तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत पक्षाचा दुपट्टा घड्यात टाकत पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,रवी रालाबंडीवार,एम डी शानू,मदनय्या माँदेशी,श्रीनिवास गोदारी आदी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!