चंद्रपूर ः अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना निवेदन दिले. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी गुण व पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना ज्या पद्धतीने केंद्रप्रमुखाच्या परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा, यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. परीक्षा परिषदेसोबत ते चर्चा करणार आहेत असे त्यांनी आश्वासित केले. परीक्षा लांबल्यास विधानसभेमध्ये अधिवेशनातदेखील हा मुद्दा लक्षवेधी म्हणून मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे चंद्रकांत पांडे, मोहन वाभीटकर,विलास कुडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नामदेव ठेंगणे, नामदेव जाधव ,नीलकंठ खरबे, काकासाहेब नागरे यांचा समावेश होता.