जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कुस्तीपटूच्या समर्थनार्थ कॅण्डल मार्च… चंद्रपुरात राष्ट्रवादी महिला काँगेसचे आंदोलन….

333

चंद्रपूर : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कुस्तीवीरांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला होता.

चंद्रपूर येथे शुक्रवारी (ता. १६) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व खेळाडुंनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा निषेध करीत कुस्तीपटू महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, जिल्हासंघटक सरस्वती गावंडे, चंद्रपूर तालुकाध्यक्ष अनिता मावलीकर, जिल्हा सरचिटणीस पूजा उईके, जिल्हा संघटक सचिव शोभा घरडे, जिल्हा सचिव नीलिमा नरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष माया देशभ्रतार, पार्वती कामटकर, वैशाली चांदेकर, सोनाली चद्दुके, लिना वैद्य, संगीता बारसागडे, सुशीला नैताम, अर्चना वैद्य, ज्योती भोयर, सिंधू निकुरे, सलमा पठाण, उषा सहारे, साधना ढोले, सुरेखा ठाकरे, रेश्मा मेश्राम, रजनी उईके, सुनीता येरमे, कांता गाऊत्रे, भोयर, अर्चना कामटकर, सारिका धोबे, किरण मडावी, कल्पना निकोडे, पपिता गोहने, साधना चांदेकर यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.