गायीन बॉम्ब खाला : अख्खा जबडाच फुटला

891

चंद्रपूर : अख्ख तोंड फुटलेल्या अवस्थेतील गाय शहरातील मार्गांवर फिरताना दिसली. तिची ही अवस्था बघून अनेकांचा हृदयाला फाझर फुटला. काहींनी प्यार फाउंडेशनला माहिती दिली. त्यांनी दोन दिवस गायीवर उपचार केला मात्र आज या गायीचा करून अंत झाला. जंगली जनावरांचा शिकारीसाठी ठेवला गेलेला बॉम्ब गायीन खाला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवीला आहे.

चंद्रपूर जिल्हात येणाऱ्या घुग्घुस शहरात धक्कादायक घटना घडली आहे. वन्यजीवांच्या शिकारीसाठी ठेवलेला बॉम्ब एका गायीन खाला. या बॉम्बच्या स्पोटमुळे गायीचा जबळा छीन्नविछीन्न झाला होता. मालकाने या गायीला मरणासाठी सोडून दिले होते.ही गाय शहरातील मार्गांवर फिरताना काहींना दिसली. तिची अवस्था बघून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. जखमी प्राण्यासाठी धावून जाणाऱ्या प्यार फाउंडेशनचे देवेंद रापल्ली यांना काहींनी भ्रमणध्वनी ने संपर्क साधून गाई बद्दल माहिती दिली. प्यार फाउंडेशनची टीमने गायीला उपचारासाठी हलविले. जखम फार मोठी होती. गायीवर दोन दिवस उपचार केले गेले. अखेर आज गायीने अखेरचा श्वास घेतला.