Homeचंद्रपूरमूलअक्षय ठरला गावातून पहिला एम. बी. बी. एस. डॉक्टर

अक्षय ठरला गावातून पहिला एम. बी. बी. एस. डॉक्टर

मुल (नवेगावं भुज):अलिकडे एक गैरसमज बनला आहे कि डॉक्टर व्हायला चिक्कार पैसा लागतो, डॉक्टर होणं सगळ्यांच्या बरोबर ची गोष्ट नाही, पण हे खोटे ठरवत मूल मध्ये नवेगावं भुजला येतील शेतकरी कुटुंबातील अक्षय रुखमागंध माहोरकर हा मुलगा एम बी बी एस डॉक्टर झाला आहे. त्याने नुकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर मधून एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण केल आहे.

डॉ.अक्षय चे बालपण मूल तालुक्यातील नवेगावं भुजला इथे गेलं, इय्यता सातवी पर्यन्त शिक्षण जि. प. उच्छ प्राथमिक शाळा नवेगावं भुजला,मराठी माध्यमातून पूर्ण केलं . घरची पारस्थिती हालाकीचीच.
आई ‘शिलाबाई माहोरकर ‘ आणि बाबा रुखमागंध माहोरकर व पाच भावंड असा मोठा परिवार त्यात अक्षय हा सर्वात लहान. उपाजीविकेच साधन म्हणजे फक्त शेती. त्यात सगळ्याचं शिक्षण म्हटलं कि खर्च वाढेलच. अशा परिस्थितीमध्ये घरचे खचले नाहीत नंतर त्याचा मोठा भाऊ आशिष रु.माहोरकर याने गावातून बाहेर निघून जिल्हयाच्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व तिथेच राहून आपला लहान भाऊ अक्षय याला सुद्धा बोलावून घेतले.

एक मराठी मुलगा, जुबिली हायस्कूल, चंद्रपूर मध्ये शिकायला आला आणि राहण्यासाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चंद्रपूर इथे ऍडमिशन घेतलं. पाहताच पहील्याच वर्षी वर्गातून क्रमांक पटकावीला आणि अक्षय चा खरा प्रवास सुरु झाला. त्यानंतर अकरावी बारावी सायन्स साठी, भावानजिभाई चव्हाण,ज्युनिअर कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले. आणि या कॉलेज मधे शिक्षकांकडून व मित्रपरिवार कडून माहिती घेऊन डॉक्टर व्हायचं असे ठरविले.नंतर नीट या मेडिकल प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे एम बी बी एस साठी ऍडमिशन घेतले. आणि तब्बल साडे पाच वर्ष अभ्यास करून आज अक्षयचा डॉ.अक्षय झाला.या प्रवासात आई-बाबा, त्याचा मोठा भाऊ आशिष माहोरकर, किशोर कांबळे (भाऊजी ) बहीण प्राजक्ता, वाहिनी अश्विनी हे सगळे पाठीचा कणा होऊन सोबत राहिले. म्हणून अक्षय चे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले असे अक्षय ने सांगितले.सध्या डॉ.अक्षय जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे कार्यरत आहे, गावाकडची ची रुग्ण आली कि नेहमी मदतीला तत्पर असतो. आज त्याला डॉक्टर म्हणून मदत करण्यास आनंद वाटतो आहे.गावातल्या मुलांनी नक्कीच स्वप्न मोठे बघावेत आणि ते साध्य करण्यासाठी आई बाबांचे चेहरे डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करावा,आयुष्यात कोणीच मागे राहणार नाही असे डॉ.अक्षय माहोरकर नी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!