सोशल मीडियावर जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करा… चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँगेसची मागणी…

1827

चंद्रपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर “तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशी जिवे मारण्याची धमकी पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून, या धमकीची गांभीर्याने दखल घेत सौरभ पिंपळकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँगेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबातचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना सादर केले आहे.

पवार यांना धमकी देणाऱ्या मागील मास्टर माईंड कोण आहे हे शोधावे. दाभोळकर हत्या करणारी शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाली आहे, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. अशा विचाराच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पवार यांना सोशल मीडियावरून देण्यात आलेल्या धमकीचा निषेध नोंदविण्यात आला.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, हिराचंद बोरकुटे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, प्रियदर्शन इंगळे, बाहादे, जुनघरी, सुधाकर काटकर, दीपक भुजाडे, वंदना आवडे, पूजा सेरकी, किरण साळवी, सरस्वती गावंडे, नंदा सेरकी, वनिता मावलीकर, जिल्हा सरचिटणीस शोभा घरडे, रेखा जाधव, शुभांगी डोंगरवार, निर्मला नरवडे यांचा समावेश होता.