दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्रुती बोरकर या विद्यार्थीनीचा सत्कार…

1209

राजुरा: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहाविच्या परिक्षेचा निकाल शुक्रवार (ता. २) जून २०२३ ला जाहिर करण्यात आला. यामध्ये इंदिरा विद्यालय वरूर रोड या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये एकूण 63 विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त झाले असून प्रथम श्रेणीत 28 विद्यार्थी,द्वितीय श्रेणीत 28 तर तृतीय श्रेणीत 2 विद्यार्थी पास झाले. सदर झालेल्या परीक्षेत इंदिरा विद्यालय वरुर रोड येथील प्रथम श्रुती प्रकाश बोरकर 78.80 टक्के,द्वितीय गणेश संतोष जितापेनावार 78.60 टक्के,तृतीय साहिल दिवाकर कुतरमारे 78.40 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. यावेळी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्रुती बोरकर या विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.श्रुती बोरकर ही विद्यार्थीनी अतिशय गुणी असून हिला शिक्षणासोबत सामाजिक कार्याची देखील आवड आहे.जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथे होत असलेल्या प्रत्येक उपक्रमात ही सहभागी होत असते. सत्कार करतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक सूरजकुमार बोबडे,प्रवीण धोटे,प्रशांत भगत, संदीप पिंपळकर, विकास नारनवरे,कुंदा मडावी,लक्ष्मी निरांजने,किशोर ताजने, करुणा जनबंधू,प्रतिभा पाडेवार, पंकज टेकाम आदी उपस्थित होते. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.