पर्यावरणाचे रक्षण आज करूया…🌴🌴

1464

पर्यावरणाचे रक्षण आज करूया🌴

संकल्प करुनिया एकच मनी
निसर्ग माय-माऊलीला फुलवूया
वसुंधरेला सुंदर मोहक बनवून
पर्यावरणाचे रक्षण आज करूया

प्रदूषणाला आज आळा घालवूया
जंगलतोड होण्यास आज थांबवूया
झाडे लावुनी झाडे जगवूया
पर्यावरणाचे रक्षण आज करूया

पृथ्वी मलिन होण्यास आज वाचवूया
प्राणघातक बिमारीला दूर सारुया
खुशाल, आनंदी जीवन जगुया
पर्यावरणाचे रक्षण आज करूया

कचऱ्याची विल्हेवाट आज लावुया
प्लास्टिक, पिशव्यांचा वापर टाळूया
मानव प्राण्यांचे जीवन वाचवूया
पर्यावरणाचे रक्षण आज करूया

पर्यावरणाचे महत्त्व समजुन घेऊया
त्याचे जतन, संवर्धन करूया
वायू,जल,मृदा प्रदूषण थांबवूया
पर्यावरणाचे रक्षण आज करूया

पाणी अडवा पाणी जिरवा
संदेश पुढच्या पिढीला देऊया
देशाचा सुजाण नागरिक होऊया
पर्यावरणाचे रक्षण आज करूया

विशाल मनोहर शेंडे, चंद्रपूर
९३०९८२४३९६