राजुरा: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहाविच्या परिक्षेचा निकाल आज शुक्रवार दि. २ जून २०२३ ला जाहिर झाला. यामध्ये स्टेला मॅरीस कॉन्वेंट स्कूल, बामणवाडा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यामध्ये एकुण १६ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त झाले असून प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतून तीन विद्यार्थी प्रविण्य प्राप्त आहे यामध्ये प्रथम श्रावणी नरखेडकर९२.२० %,द्वितीय अक्षिता गोरपाटी ८६.८० %,तृतीय दर्शना तिरसुळे ८६.४० टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व स्टेला मॅरीस कॉन्वेंट स्कूलचे मुख्याध्यापिका, सिस्टर प्रभा डी एम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.