Homeचंद्रपूरभारतीय संविधानाला साक्ष मानून बांधली लगीनगाठ नवरीनं लग्न मंडपात केली खास एन्ट्री

भारतीय संविधानाला साक्ष मानून बांधली लगीनगाठ नवरीनं लग्न मंडपात केली खास एन्ट्री

भंडारा/लाखनी : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.अलीकडे विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढविल्या जाते, ज्यासाठी बक्कळ पैसा उडविला जातो. मात्र, ‘या’ विवाह सोहळ्यात असा प्रकार नसला तरीही चर्चा मात्र जोमात आहे. नवरीनं विवाह समारंभात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केली अन् उपस्थीत पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतलं.

लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरूणी प्रांजल धनराज बडोले हीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही पत्रकार आहेत. विचाराने प्रगल्भ असलेल्या ‘या’ नव विवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्ष विवाह पार पाडण्याचा विचार केला अन् तो अमलातही आणला. तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह सोहळ्याला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वातत्र, समता, आणि बंधूता ही सांविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात जिवन जगण्याचा संकल्प देखील केलाय. या विवाह सोहळ्याचं पून्हा एक खास आकर्षण म्हणजे डॉ.बाबासाहेबांनी व्ही.एस.कर्डकांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा, यासंदर्भात ४ डिसेंबर १९५६ मध्ये पत्र लिहीलं होतं. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं.
या विवाह सोहळ्याला बौध्द भिक्कू आदरणीय नाथ पुन्नो, बौध्द धम्माचे प्रचारक प्रा.सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे लग्न समारंभाचं सुंदर सुत्रसंचालन नीशा रामटेके (शेंडे) आणि प्रभाकर सोनडवले यांनी केलं.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!