Homeचंद्रपूरराजुराआमदार सुभाष धोटेंची चंद्रपूर काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड.

आमदार सुभाष धोटेंची चंद्रपूर काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड.

राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांची चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील घटनांचा वेध लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडून ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद काढून तो प्रभार चंद्रपूर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्याकडे सोपविले मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील जीवघेणा हल्ल्यानंतर त्यांच्याकडून माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने आल्याने त्यांना पदावरून हटवण्याची जिल्हा बँकेच्या बहुतांश संचालकाकडून झालेली मागणी लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांना दिलेला प्रभार काढून घेत आज अखेर जिल्ह्याच्या राजकारणातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेता असलेल्या आमदार सुभाष धोटे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार सोपवलेला आहे.

आमदार सुभाष धोटे चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतानाच मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला न भुतो न भविष्यती असे अभूतपूर्व यश मिळाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस खासदार लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर निवडून आले. त्यामुळे आ. सुभाष धोटे यांच्या या निवडीने जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पून्हा एकदा तसेच घवघवीत यश काँग्रेसला मिळेल अशी आशा पल्लवित झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हा तसेच राज्य पातळीवरील काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!