Homeचंद्रपूरराज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण १ लक्ष ५१ हजार रुपयांचे प्रथम...

राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण १ लक्ष ५१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस अमित गोनाडे ग्रुपला

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव भाग २ आयोजीत करण्यात आले होते, या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २५ मे रोजी मनपा सभागृहात पार पडला.आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते विजेत्यांना धनादेश वाटप करण्यात आले.

चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग या स्पर्धा यात घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत संतांची शिकवण व भारतीय संस्कृतीची चित्रे विशेष आकर्षण ठरले होते.स्पर्धेत चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट ठेवण्यात आला होता. व्यावसायिक गटात १ लक्ष ५१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस अमित गोनाडे व सहकारी यांना प्राप्त झाले असुन १ लक्ष रुपयांचे द्वितीय बक्षीस राकेश धवने तर ५१ हजार रुपयांचे तृतीय बक्षीस किरण कत्रोजवार यांना मिळाले आहे.
वैयक्तिक गटात ७१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस शाम गेडाम यांना, ५१ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस मनोहर भानारकर यांना तर ३१ हजार रुपयांचे तृतीय बक्षीस उमाशंकर भोयर यांना प्राप्त झाले तसेच प्रत्येकी १० प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा देण्यात आली. त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत २१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस प्रमोद सेलोटे, १५ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस सुहास ताटकंटीवार तर ११ हजार रुपयांचे तृतीय मारोती मानकर यांना प्राप्त झाले आहे. हे सर्व पुरस्कार क्रेडाई चंद्रपूर,सीटीपीएस,डब्लुसीएल,बँक ऑफ बडोदा,बँक ऑफ महाराष्ट्र,महाजेनको,प्रॅक्टिसिंग आर्कीटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे प्रायोजीत करण्यात आले होते.
महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अभियान अंतर्गत ०७ मार्च २०२३ ते दि.१५ मार्च २०२३ या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी “स्वच्छोत्सव – २०२३” ” महिला आयकॉन अग्रणी स्वच्छता पुरस्कार – २०२३ ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्वच्छताविषयक विशेष कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानीत केले गेले. स्वाती धोटकर यांना इकॉर्निया वनस्पतीपासुन विविध उपयोगी वस्तू बनविल्याबाबत ,किरण तुरणकर यांना अस्वच्छ परीसर स्वच्छ करून सौंदर्यीकरण केल्याबद्दल तर उषा बुक्कावार यांना होम कंपोस्टींग बाबत जनजागृती केल्याबद्दल महिला आयकॉन अग्रणी स्वच्छता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे,डॉ.अमोल शेळके, सीटीपीएसचे चंद्रपूर महाव्यवस्थापक,डब्लुसीएलचे व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी लाटकर तसेच क्रेडाई चंद्रपूर,बँक ऑफ बडोदा,बँक ऑफ महाराष्ट्र,महाजेनको,प्रॅक्टिसिंग आर्कीटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!