Homeचंद्रपूरमूलसिमेंटचे इलेक्ट्रिक पोल वाहून नोतांना ट्रक्टरचा अपघात दोन मजूरांचा जागीच मृत्यू,तर एक...

सिमेंटचे इलेक्ट्रिक पोल वाहून नोतांना ट्रक्टरचा अपघात दोन मजूरांचा जागीच मृत्यू,तर एक जखमी

मूल :- सिमेंटचे इलेक्ट्रिक पोल वाहून नेणा-या ट्रक्टरचा अपघातात दोन मजूरांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिपरी दिक्षित येथे घडली.मृतकाची नावे निपुण पांडूरंग मराठे(वय30), मृतक अंकूश राजू गंदेशिरवाड( वय 28 )ते दोघेही केळझर येथील रहिवासी आहेत.ईश्वर भाऊजी मांडवकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे

या अपघाताप्रकरणी ट्रक्टर चालकाविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमएच 34 एपी 1306 या क्रमांकाची ट्रक्टर केळझर येथील शशीकर कुमरे यांच्या मालकीची आहे.
येथील तीन मजूरांना सोबत घेवून ट्रक्टर चालकाने चकघोसरी येथे सिमेंटचे सहा इलेक्टिक पोल ट्रालीमध्ये चढविले.त्यांनतर ही ट्रक्टर भंजाळी येथे जायला निघाली.पिपरी दिक्षितच्या पुढे निघाल्यानंतर ट्रक्टर ट्राली जोराने हलायला लागली.सिमेंटच्या पोलवर बसलेल्या तीन मजूरांनी आरडा ओरड केली.परंतु चालक चालविण्याच्या धुंदीत होता. त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने मागे पाहत पाहत ट्रक्टर चालविली.त्यामुळे ट्रक्टर रोडच्या खाली उतरली आणि तेवढयात ट्राली उलटली.त्यात सिमेंट पोलच्या खाली तीनही मजूर दबल्या गेले. त्यात मृतक निपूण पांडूरंग मराठे आणि अंकूश राजू गंदेशिरवाड यांचा जागीच मृत्यु झाला.तर गंभीर जखमी झालेल्या ईश्वर भाउजी मांडवकर याच्यावर उपचार सुरु आहे. ट्रक्टर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याने चालक आशिष भाऊराव निकोडे याच्या विरुध्द मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र डोंगरे करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!