Homeचंद्रपूरबिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी विचार समाजात रुजवा - आ. किशोर जोरगेवार ...

बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी विचार समाजात रुजवा – आ. किशोर जोरगेवार प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे पार पडला महानायक बिरसा  मुंडा नाट्य प्रयोग

 

चंद्रपूर: आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता बिरसा मुंडा यांनी ओळखली होती. यासाठी त्यांनी संपुर्ण समाजाला संघटित करत ब्रिटिश सरकार विरोधात स्त्रातंत्र्याचा लढा उभारला. समाजाच्या न्यायक हक्कासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरक असुन अशा नाट्य प्रयोगाच्या माध्यमातुन त्यांचे क्रांतिकारी विचार समाजात रुजवा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदिवासी विरांची समरगाथा या अभियाना अंतर्गत कालवैभव नाट्य व सांस्कृतिक संस्था, निर्मित आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात महानायक बिरसा हा दोन अंकी नाटय प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. या प्रसंगी सहा. जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एम. मुरुगानंथम, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरत मडावी, डॉ. कपिल गेडाम, तहसीलदार जितेंद्र गादेवार, सहा. प्रकल्प अधिकारी सुनील बावणे, सामाजिक कार्यकर्ता सुनिल पाटील, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, प्रमोद बोरिकर, कृष्णा मसराम, विजय कुमरे, महेश जुमनाके, प्रदिप गेडाम, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अशोक उईके, सुभाष शेडमाके, राजेंद्र धुर्वे, दिवाकर मेश्राम, ओंकार गेडाम, बाळू कुळमेथे, मुकेश कुरडकर आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, ब्रिटीशांविरूद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. बिरसा मुंडा हे आदिवासी नेते आणि लोकनायक होते. त्याकाळी त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी बलाढ्य अश्या ब्रिटिशांविरोधात संघर्ष केला. त्यांचा हा त्याग समाज कधीही विसरु शकणार नाही असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
आजही आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. समाजाच्या वतीने त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केल्या जात आहे. तुमच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकार आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी काम करत असल्याचा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी समाजबांधवांना दिला. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा आहे. आदिवासी समाज हा ऐकेकाळी या जिल्हाचा राजा होता. त्यामुळे त्यांच्या समस्यांना प्राथमिकता देण्याची गरज असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखवले. आज नाट्य प्रयोगाच्या माध्यमातुन आपण क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. हे कार्य अजुन गतीशील करा महानायक बिरसा या दोन अंकी नाटकाचे अधिकाधिक प्रयोग सादर झाले पाहिजे यात शक्य ती सर्व मदत करण्याची आमची तयारी असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. सदर नाट्य प्रयोग बघण्यासाठी नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!