Homeचंद्रपूरधक्कादायक आकडेवारी : चंद्रपुर जिल्हात मागील ३ महिन्यात १०१ मुली बेपत्ता...

धक्कादायक आकडेवारी : चंद्रपुर जिल्हात मागील ३ महिन्यात १०१ मुली बेपत्ता…

प्रलय म्हशाखेत्री (विदर्भ ब्यूरो चीफ)

चंद्रपूर: राज्य सरकारच्या वेबसाईटवर महिला व मुली बेपत्ता Girls Missing होण्याची असलेली आकडेवारी चिंताजनक असल्याची खेद राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकनकर (Rupali Chakankar President of State Commission for Women) यांनी व्यक्त केली, महिलांच्या तपासासाठी गृह खात्याने (Home Ministry) स्वतंत्र समिती स्थापन करावी व शोध मोहीम राबवावी आणि दर पंधरा दिवसांनी केलेल्या कारवाई चा अहवाल महिला आयोगाला सादर करावा अश्या सूचना गृह विभागाला केल्या असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांत 16 ते 25 वर्ष वयोगटातील 3 हजार 594 तरुणी बेपत्ता झाल्याची खळबळजनक बाब पुढे आली. नौकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून तरुणींचे लैगिक शोषण केल्या जाते, परराज्यात तसेच देशाबाहेर तरुणीची विक्री करण्यात येते यानुषंगानें गृह विभागाने तपास करावा अशी मागणी रुपाली चाकनकर यांनी गृह विभागाला केली आहे.

राज्य सरकारने राजकारण सोडून या गंभीर विषयाकडे लक्ष घालावे, परंतु तसे होतांना दिसत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला, ज्या तत्परतेने कार्य व्हायला पाहिजे तशी गती नसल्याचेही त्या बोलल्या.

बेपत्ता तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी

अहमदनगर 184, अकोला 41, अमरावती शहर 31, अमरावती ग्रामीण 63, औरंगाबाद शहर 66, औरंगाबाद ग्रामीण 52, बीड 27, भंडार 23, मुंबई शहर 383, बुलढाणा 76, चंद्रपूर 101, धुळे 45, गडचिरोली 13, गोंदिया 46, हिंगोली 14, जळगाव 121, जालना 36, कोल्हापूर 127, लातूर 42, मीरा-भाईंदर 113, नागपूर शहर 108, नागपूर ग्रामीण 169, नांदेड 36, नंदुरबार 37, नाशिक शहर 93, नाशिक ग्रामीण 169, नवी मुंबई 75, उस्मानाबाद 34, पालघर 28, परभणी 27, पिंपरी चिंचवड 143, पुणे शहर 148 आणि पुणे ग्रामीण 156 अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी 16 ते 25 वयोगटातील आहेत.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!