सावित्री महिला ग्रामसंघाने राबविली स्वच्छता मोहीम… अनेक महिलांनी घेतला सहभाग

426

बळीराज काळे (जिवती तालुका प्रतिनिधी)

जिवती (ता.प्र.) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिवती तालुक्यातील सावित्री महिला ग्रामसंघ, लांबोरी यांच्या वतीने लांबोरी येथे सामाजिक समावेशन मोहिमे अंतर्गत सर्व महिलांनी एकत्र येत गाव स्वच्छता केली. सर्व महिलांनी हातात झाडू घेत गावातील रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.

यात मुख्यत्वे गावातील icrp, आशा नामदेव कांबळे, कृषि सखी, चंदा बालाजी राजपंगे, पशु सखी, धम्मशीला ढगे, अध्यक्ष,रंजना गायकवाड, अंगणवाडीताई, चुऊत्तराबाई कांबळे व इतर महिलांचा सहभाग होता.
गावातील स्वच्छता केल्यावर सर्व माहिला एकत्र बसल्या व त्याचे रूपांतर सभेत झाले. सभेत icrp, आशा कांबळे यांनी सर्व महिलांना उमेद अभियान विषयी मार्गदर्शन केले.