Home चंद्रपूर राजुरा काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा :...

काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा : अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. – आमदार सुभाष धोटे.

450

राजुरा (ता.प्र) :– चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा मुल येथील झुंजार काँग्रेस नेते संतोषजी रावत यांच्यावर काल काही अज्ञात इसमांनी गोडीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते या भ्याड हल्ल्यातून बचावले, किरकोळ जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्हय़ाच्या सौहार्दपूर्ण सांस्कृतिक वैभववाला छेद देणारी ही घटना असून या भ्याड हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना अनेकदा आपआपसात मतभेद होत असतात, कलह निर्माण होतात परंतु कारण कुठलेही असो, राजकीय वैमनस्य असो की अन्य कुठलेही कारण असो, गुन्हेगार नेमके कोण आहेत. या हल्ल्या मागील नेमके कारण काय आहे यासर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच संतोष रावत यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार सुभाष धोटे यांनी दिला आहे.

Don`t copy text!