चंद्रपूर: येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम चंद्रपूर तथा विदर्भ जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांच्यामार्फत राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजू,पिढीत लोकांना मदत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे अशा प्रकारचे नानाविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.तसेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असतात. दिनांक 5 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






