Homeचंद्रपूरजिवतीमाराईपाटण येथे शाळा पूर्वतयारी पालक व बालक मेळावा संपन्न... दाखलपात्र विद्यार्थ्यांचे ...

माराईपाटण येथे शाळा पूर्वतयारी पालक व बालक मेळावा संपन्न… दाखलपात्र विद्यार्थ्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बळीराम काळे,जिवती

 

जिवती :  तालुक्यातील  पंचायत समिती अंतर्गत (ता.29) ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माराईपाटण येथे शाळापूर्व बालक पालक मेळावा अभियान उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मेळाव्याची सुरुवात प्रभातफेरीने करण्यात आली.
मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष श्री. विलास करपते, प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष प्रदीप काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य  तसेच ग्रा.पं उपसंरपंच विकास सोनकांबळे,सदस्य व मुख्याध्यापक,सहायक शिक्षक ,आंगणवाडी सेविका विमल लांडे, प्रामुख्याने महिला व गणमान्य व्यक्ती हजर होते.
सर्वप्रथम दाखलपात्र मुलांचे पुष्प गुच्छ व फुगे देऊन स्वागत करण्यात आले. व सातही स्टॉलवर मुले व त्यांच्या मातापालकांनी भेटी देवून कृतीपुस्तिकातील कृती समजून घेतल्या,.मनोरंजनात्मक खेळ, गोष्टी व गीतांचा मुलांनी खूप आनंद लुटला. विद्यार्थ्याचे कार्ड्स भरून घेण्यात आले.
वजन उंची व इतर नोंदी घेण्यात आल्या. पाहुण्यांनीही स्टॉल्सला भेटी दिल्या व उन्हाळ्यात ते पण स्वयंसेवकांची भूमिका बजावतील असे अभिवचन दिले. मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी मुख्याध्यापल श्री. विजय आकनूरवार शिक्षक श्री. बी. एम. बानकर, श्री. जी. के. जरिले, अंगणवाडी सेविका सौ. लिपटे ताई यांचे सहकार्य लाभले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!