Homeचंद्रपूरएक आजार हे ठासून सांगण्याची गरज - डॉ. एस एस पालीवाल ...

एक आजार हे ठासून सांगण्याची गरज – डॉ. एस एस पालीवाल “झेप ‘ इमारत स्थलांतर सोहळा – मार्गदर्शन पण कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर: मद्यपाश हा एक गंभीर आजार असून समाजात त्याला आजार न मानल्यामुळे कालांतराने तो गंभीर अवस्थेत जाऊन संपूर्ण कुटुंबाचे व मद्यपीचे अतोनात नुकसान होते. या आजारावर उपचार करण्यासाठी वैज्ञानिक शारीरिक मानसिक व अध्यात्मिक यांची सांगड घालून उपचार केल्यास यातून मद्यपी रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणून मध्यपाश एक आजार आहे हे ठासून सांगण्याची गरज आहे. असे प्रतिपादन चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. एस एस पालीवाल यांनी केले ते जनहिताय मंडळ द्वारा आयोजित झेप व्यसनमुक्ती केंद्राच्या नवीन इमारत स्थलांतर प्रसंगी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

गेल्या 28 चंद्रपूर शहरात झेप व्यसनमुक्ती केंद्र अविरत सेवा देत आहे. सदर व्यसनमुक्ती केंद्रातून अनेक मद्यपी रुग्ण बरे झाले असून आज मद्य विरहित जीवन जगताना अनेकांची कुटुंब सावरल्याचे दिसून येते. शहरातील माता महाकाली मंदिरा मागील इमारत निर्लेखित करण्यात येत असल्याने जनहिताय मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित झेप मुक्ती केंद्राची नवीन इमारत शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे मागे नव्याने उभारण्यात आली असून याचा स्थानांतरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ता डॉ. बी. डी.पालीवाल.महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष त्रिशूल बंब को , महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त अनिल डोंगरे, जनहिताय मंडळाचे सचिव डॉ. एस एस पालीवाल, सतीश व्यास, प्रा. तुरारे , जनहिताय मंडळाचे प्रकाश पालीवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित कार्यशाळेत संतोष कुलमेथे, संतोष पिंपळकर, निलेश धामणकर, राजेश आत्राम यांनी आपल्या आत्मकथनातून रुग्ण मित्रांना मार्गदर्शन केले. तर धन्वंतरी सभेच्या माध्यमातून डॉ. ठाकूरवार व डॉक्टर संगीता पोतले यांनी मद्यपाश हा कौटुंबिक आजार आहे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सोबतच मानसिक रित्या खचलेल्या व पूर्ण मध्यपाषात अडकलेल्या रुग्णू मित्रांना तीस ते पस्तीस दिवस झेप व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून त्यांना वैज्ञानिक अध्यात्मिक शारीरिक व मानसिक या उपचार पद्धतीने तसेच त्याचे कौटुंबिक कलह पुनर्वसन पद्धतीने जो उपचार केला जातो यावर विस्तृत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल लोणारे गीता पालीवाल तर आभार प्रदर्शन मारुती साव व सपना दिंडे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी झेप व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय तसेच जीप व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!