Homeचंद्रपूरकर्तृत्ववान नेतृत्व हरपल्याने पक्षाची मोठी हानी - माजी मंत्री वडेट्टीवार...शोक संवेदना -...

कर्तृत्ववान नेतृत्व हरपल्याने पक्षाची मोठी हानी – माजी मंत्री वडेट्टीवार…शोक संवेदना – माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन

चिमूर- क्रांतीभूमी चिमूरच्या १९९०-९५ च्या रणसंग्रामात काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकां पैकी एक असे निष्ठावंत कार्यकर्ते बाबुराव वाघमारे यांना उमेदवारी देऊन आमदार केले. पक्षाने टाकलेल्या जबाबदारी व विश्वासाला तडा न जाऊ देता जनतेची कामे हिरीरीने करून अविकसित क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चळवळ उभारणारे व कर्तव्याप्राती अतिशय प्रामाणिक असे माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या निधनाने ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेले कर्तुत्वान नेतृत्व हरपल्याची खंत व्यक्त करीत पक्षाची मोठी हानी झाल्याची शोकसंवेदना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.ते माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या अंतविधी प्रसंगी शोकसभेत बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून दीर्घ आजाराशी सामना करतांना काल रात्रौ ७.३० वाजताच्या सुमारास १९९०-९५ कालावधीतील (पूर्वीचा मतदार संघ) चिमूर मतदार संघाचे आमदार बाबुराव वाघमारे यांची प्राणज्योत मावळली. ही वार्ता कानी पडताच राजकीय वर्तुळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेस नेते यांच्यात शोककळा पसरली.आज सकाळ पासून माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पक्ष कार्यकर्त, नेते, व चाहता वर्ग यांच्या रांगा लागल्या.तर दुपारी २.०० वाजताच्या सुमारास मोहाडी (नलें.) येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी करिता हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. माजी आमदार बाबुराव वाघमारे यांना श्रध्दांजली अर्पण करीत शोक संवेदना व्यक्त करतांना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले राजकारणातील ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्यांना घेऊन शासनदरबारी मांडणाऱ्या माजी आमदार बाबुराव वाघमारे यांची कार्यकुशलता व धडपड ही युवा राजकारण्यांना प्रेरणा देणारी आहे. चौफेर उमा नदीने वेढलेल्या क्षेत्रातील गावांना छोटे पूल, रस्ते व अन्य विकासकामांना प्राधान्य क्रमाने महत्त्व देऊन ते मंजूर करण्यात अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे कार्य हे आजही व उद्याही अजरामर राहतील.अशी शोकसंवेदणा माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.तर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत जीवन शैली, पक्ष निष्ठा, व कार्य करण्याची तळमळ , याची विस्तृत माहिती उपस्थित जनसमुदायाला देत सहवासातील माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या प्रति आपल्या शोक संवेदना प्रकट केल्या. यानंतर माजी आमदार डॉ. रमेश गजबे, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम, रघुनाथ शेंडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे, अशोक नागापुरे,बाबूलाल शेंडे, हरिभाऊ बारेकर, अरविंद जयस्वाल,अशोक साळवे, मधुकरजी मुपीडवार, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाने, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, अभिजीत मुपीडवार, यांनी शोक सभेतून श्रद्धांजली वाहिली. यानंतर स्वर्गीय माझी आमदार बाबुरावजी वाघमारे अमर रहे अशा घोषणा देत त्यांचे फार जवळ अंतिम संस्कार करीत मुखाग्नी देण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!